Self-respecting lofty leaders of the Ambedkar movement should be considered for the Legislative Assembly । आंबेडकर चळवळीतील स्वाभिमानी बुलंद नेतृत्वांचा विधानसभेसाठी विचार व्हावा -NNL
हदगाव/हिमायतनगर,रमेश पंडित। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणालीची तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वाभिमानी विचारांची चळवळ यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने जी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेतृत्वशील कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली त्या फळीला कुठेही तोड नाही. नांदेड जिल्ह्यातील हदगाव सारख्या तालुक्यातून देशाच्या राजकारणा मध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे तसेच लोकसभेमध्ये भल्या भल्या विद्वानांना आपल्या विचार सामर्थ्याच्या माध्यमातून घाम फोडणारे निळ्या झेंड्याचे नांदेड जिल्ह्याचे पहिले खासदार हरिहरराव सोनुले यांचा कार्यकाळ जर सोडला तर संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील मतदार संघामध्ये कोणत्याही मतदारसंघांमध्ये आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व उभारू शकले नाही.
नांदेड जिल्ह्यातील तालुका परंतु हिंगोली लोकसभा मतदार संघातील हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघा चा आपण व...
