SBI branch officer Pritam Thorat : दहावी नंतर विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे -एसबीआय शाखाधिकारी प्रीतम थोरात
लोहा| शालेय जीवनात दहावी हा टप्पा महत्वाचा असतो. पुढील काळात आपण काय करणार आहोत याचे ध्येय निश्चित करावे लागेल आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत आणि स्पर्धेत टिकण्यासाठी त्याला मेहनतीची जोड दिली पाहिजे असे मार्गदर्शन लोहा येथील एसबीआय बँकेचे मॅनेजर प्रीतम थोरात यांनी केले.
लोहा शहरातील शिवछत्रपती विद्यालयात इयता दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप व परीक्षा शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून लोहा एसबीआय शाखेचे व्यवस्थापक प्रीतम थोरात , संस्थेचे कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील पवार, हे होते.
प्रमुख मार्गदर्शक श्री थोरात यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला , स्पर्धा ही ग्रामीण -शहरी अशी असते. त्यामुळे मुंबई -पुणे या विद्यार्थ्यांशी सुद्धा होणार आहे तेव्हा आपण स्पर्धेत टाकले पाहिजे यासाठी मेहनत करावी जिद्...
