Gharkul construction : घरकुल बांधकामाचे रखडलेले अनुदान देण्याची साहेबराव शेटे यांची मागणी -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना शासनाकडून प्रधानमंत्री आवास घरकुल योजने अंतर्गत निवड करण्यात आली आहे. मात्र काही लाभार्थीना घरकुल बांधकामाचे देयके देण्यास अभियंत्यांकडून टाळाटाळ चालवली जात आहे. पंचायत समिती कार्यालयात चकरा मारूनही घरकुल बांधकामाचे अनुदान मिळत नसल्याने खडकी बा.येथील साहेबराव शेटे यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडे चौकशी मागणी केली आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेतून घर नसलेल्यांना पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल मंजूर करून त्याना लाभ दिला जातो. ग्रामीण भागात एका घरकुलाला 1 लाख 60 हजार रुपये शासनाकडून अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायती मार्फत करण्यात येते. लाभार्थींना स्वत:च्या ३०० स्क्वेयर फूट जागे...
