Rahul Kardile ; महसूल दिनाचे नांदेड तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहाने उद्घाटन
नांदेड l 1 ऑगस्ट 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले सर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन तहसील कार्यालय नांदेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच 1 ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार महसूल सेवक कार्यालयातील सर्व महसूल सहाय्यक ,सहाय्यक महसूल अधिकारी पुरवठा विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये मा जिल्हाधिकारी महोदय यांच्या हस्ते अल्पभूधारक प्रमाणपत्र ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र मिळकत प्रमाणपत्र रेसिडेंट प्रमाणपत्र याचे प्रतिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
तसेच एकूण 27 बिडी कामगारांना राशन कार्ड चे वितरण करण्यात आले. शासनाच्या 100 दिवस प्रशासकीय सुधारण...
