Risk of digital fraud : दिवाळी दरम्यान डिजिटल फसवणुकीचा धोका: क्विक हील
मुंबई| क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना देणाऱ्या कंपनीने आज ग्राहकांना व व्यवसायांना मोठा सल्ला दिला की, दिवाळी सणादरम्यान केल्या जाणाऱ्या खरेदीवर लक्ष्य करत अत्याधुनिक सायबर फसवणूकीमध्ये वाढ होत आहे. भारतातील सर्वात मोठी मालवेअर विश्लेषण सुविधा सेक्यूराइट लॅब्समध्ये संशोधकांनी निदर्शनास आणले आहे की, सायबर गुन्हेगार अत्यंत वैयक्तिकृत व संदर्भीय हल्ले करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स-समर्थित साधनांचा वापर करत आहेत.
उद्योग डेटामधून निदर्शनास येते की, दिवाळी २०२४ दरम्यान ई-कॉमर्स विक्रीने ९०,००० कोटी रूपयांचा टप्पा पार केला, तसेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने पीक सीझनदरम्यान दररोज १३ लाखांहून अधिक बुकिंग्जची हाताळणी केली. डिजिटल व्यवहारांमधील या मोठ्या वाढीमुळे सेक्यूराइट लॅब्समध्ये संशोधकांनी सायबर गुन्ह्...
