Shivraj Singh Chouhan ; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्या : खा. डॉ. अजित गोपछडे यांची कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आग्रही मागणी
नांदेड l नांदेड शहरासह बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, धर्माबाद, उमरी, भोकर, नायगाव , अर्धापुर आदी तालुक्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेत खा. डॉ. अजित गोपछडे यांनी कृषिमंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांची विशेष भेट घेऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे तसेच पिकविमा रक्कम तत्काळ मंजूर करून देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली.
बिलोली व देगलूर तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग , ज्वारी , उडीद, हळद आदी पिकांवर अतिवृष्टीच्या पुरामुळे संकट आले आहे. हजारो एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्जफेड, घरखर्च, मुलांचे शिक्षण यांसह आयुष्यभराची घडी विस्कटण्याची वेळ आली आहे. शेतकरी डबघाईला पोहोचू नयेत यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले त्वरित उचलावीत...
