Crop loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या – आ. श्रीजया चव्हाण
नांदेड, अनिल मादसवार| भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील पीक कर्ज वितरणाचा मुद्दा (Provide crop loans to farmers - MLA Sreejaya Chavan) आज विधानसभेत मांडला. शेतकरी आर्थिक अडचणीत असून, त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
विधानसभेत बोलताना आ. श्रीजया चव्हाण म्हणाल्या की, खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना झाला. कालपर्यंत नांदेड जिल्ह्यात ८२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, अद्याप नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्दिष्टाप्रमाणे पीककर्ज वितरित झालेले नाही. नांदेड जिल्ह्यात खरिप हंगामासाठी एकूण १ हजार ८५० कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. परंतु, आतापर्यंत केवळ ९०० कोटी रुपये म्हणजे सुमारे ५० टक्के कर्ज वितरण झाले आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत ४४५ कोटी रूपयांचे वाटप करून १०० टक्के उद्दिष्ट पूर्...
