voters ; मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा : निरीक्षकांकडून आढावा मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन – NNL
नांदेड l नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नांदेड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने सुचवल्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करा. हिवाळ्यातील छोटा दिवस बघता प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक प्रकाश यंत्रणा असावी, असे आवाहन निवडणूक निरीक्षकांनी आज केले.
नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आलेल्या सामान्य ,खर्च आणि पोलीस निरीक्षकांची एकत्रित बैठक आज नांदेड विश्रामगृहामध्ये झाली. या बैठकीला श्रीमती बी. बाला माया देवी (भाप्रसे),शेलेंद्रकुमार (भाप्रसे),श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) रण विजय यादव (भाप्रसे) कालु राम रावत (भापोसे),मृणालकुमार दास (आयआरएस ) मयंक पांडे ( आयआरएस), ए. गोविंदराज (आयआरएस) त्यांच्यासोबतच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर ,ज...
