Prasad Harichand Ade ; प्रसाद हरीचंद् आडे – SET परीक्षा उत्तीर्ण – NNL
हदगाव/हिमायतनगर। हदगाव तालुक्यातील मौजे पळसा या गावापासुन काही अंतरावर असलेल्या मौजे किनाळा तांडा येथील रहिवासी श्री हरीचंद कनिराम आडे हे सामान्य व्यक्ती असुन त्यांच्या कुटुंबात जन्मलेले प्रसाद हरिचंद आडे हे 7 एप्रिल 2024 रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत झालेल्या राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा (SET) विषय - लाइफ सायन्स मध्ये उत्तीर्ण झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हाळा येथे तर माध्यमिक शिक्षण विवेकानंद माध्यमिक विद्यालय हदगाव येथे झाले असुन उच्च माध्यमिक शिक्षण सायन्स कॉलेज नांदेड व BSc. (Biotechnology) MGM कॉलेज नांदेड येथे झाले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व Government Institute of science छत्रपती संभाजीनगर येथून Msc Biophysics मध्ये प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
त्याचबरोबर National Agri-Food Biotechno...
