Wednesday, May 13

Tag: Penal action against

tobacco sellers : उमरी शहरात 20 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

tobacco sellers : उमरी शहरात 20 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड, क्राईम
नांदेड| उमरी शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने आज रोजी उमरी शहरात विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 20 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाहीत 9 हजार 200 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशाखाली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, डॉ. संजीवनी जाधव, डॉ. पूजा भाकरे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड व एमजीवीएसचे मंगेश गायकवाड तसेच उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांच्या मार्गदर्शनाख...
Penal action : बिलोली शहरात 22 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

Penal action : बिलोली शहरात 22 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड, क्राईम
नांदेड| जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने शुक्रवार 11 एप्रिल रोजी बिलोली शहरात अचानक धाडी टाकून 22 तंबाखू विक्रेत्यांकडून 10 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बिलोली शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्य...
error: Content is protected !!