Dr. Shankarao Chavan Government Medical College | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन -NNL
नांदेड| शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते पार पडला. सदर स्पर्धेतील विजेत्यांना अधिष्ठाता डॉ. देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्याबाबत विद्यार्थ्यांना समाजात जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित केले.
वत्कृत्व स्पर्धेमध्ये या महाविद्यालयातील तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातल विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला. एकूण 100 विद्यार्थ्यांनी रांगोळी, पोस्टर, कविता, घोषवाक्य, निबंध आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अधिष्ठाता यांनी अवयवदानाच्या महत्वावर प्रक...
