Samarasata Literature Conference : २० वे समरसता साहित्य संमेलन २ व ३ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये होणार
The 20th Samarasata Literature Conference will be held in Nanded on August 2nd and 3rd नांदेड| समरसता साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने २० वे समरसता साहित्य संमेलन नांदेड येथे २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. हे संमेलन श्री गुरुगोविंदसिंघजी साहित्यनगरी, भक्ती लॉन्स, मालेगाव रोड, नांदेड येथे होणार असून, याची माहिती स्वागताध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री नामदेव चं. कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. नामदेव कांबळे हे ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक व 'राघववेळ' या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आहेत. संमेलनाचे उद्घाटन वंदनीय भदंत डॉ. राहूल बोधी महाथेरो (अध्यक्ष, ऑल इंडिया भिक्खू महासंघ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. किशोर मकव...
