MLA Prataprao Patil Chikhlikar : आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ‘एक्शन मोड’वर
नगराध्यक्ष शरद पवार व टीम कठोर निर्णयाच्या भूमिकेत
शहरातील वाहतुकीला शिस्त लावा
पार्किंग व्यवस्था मार्गी लावा
नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करा
लोहा | लोहा शहरात बॅनर लावण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याची गंभीर दखल घेत नगरपालिकेला थेट एक्शन मोडवर आणले आहे. शहरातील कोणत्याही दुकानासमोर किंवा प्रतिष्ठानासमोर बॅनर लावू नयेत, बॅनरसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सक्त सूचना त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
मागील काही वर्षांपूर्वी शहरात बॅनर व होल्डिंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्याचा निर्णय कागदावर झाला होता. मात्र नगरपालिकेकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने शहराचे विद्रुपीकरण सुरूच राहिले. अनेक तक्रारी होऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिक व व्...
