Method and features of Tulsi marriage celebration : तुळशी विवाह साजरा करण्याची पद्धत आणि वैशिष्ट्ये -NNL
तुळशी विवाह निमित्ताने तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा ? यासंबंधीची शास्त्रीय माहिती तसेच आपत्कालीन स्थितीत तुळसी विवाह साजरा करण्याविषयी उपयुक्त सूत्र या लेखात देत आहोत.
1. तिथी - हा विधी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात.
2. पूजन - श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात.
3. वैशिष्ट्ये - तुळशी विवाह झाल्यानंतर च...
