Aundha Nagnath : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा
हिंगोली| महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रापैकी असलेल्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर आढावा घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.जी. पोत्रे, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे, भारतीय पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्री. गोटे, पुजारी शेखर मनोहर भोपी, महंत सुरेश गिरी, वद्रमाक्ष पाठक, विकासक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत औंढा नागनाथ परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सौंदर्यीकरण, तसेच पर्यावरणपूरक विकास यावर विशेष चर्चा करण्यात आली.
भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रस्तावित विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये. धार्मिक, ऐति...
