Wednesday, May 13

Tag: of Sauponi Raghunath Vanne of Waka; Burial in state ceremony

Burial in state ceremony : वाका येथील सउपोनि रघुनाथ वन्ने यांचे अकाली निधन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -NNL

Burial in state ceremony : वाका येथील सउपोनि रघुनाथ वन्ने यांचे अकाली निधन ; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर, माणिक भिसे| वाका ता.लोहा येथील ‌भूमीपुत्र तथा‌ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात पुणे‌ एअरपोर्ट लोहगाव येथे कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक रघुनाथ भुजंगा वन्ने‌ (वय‌ ५३) हे कर्तव्यावर असताना अकाली मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात वाका येथे शुक्रवारी (दि.२७) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय औद्योगिक बलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिवंगत वन्नेंना‌ मानवंदना दिली. यावेळी अंत्यसंस्कारासाठी परिसरातील नागरिक उपस्थित होते.. वाका‌ येथील भूमिपुत्र रघुनाथ भुजंगा वन्ने‌ (वय‌ ५३) यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वाका व कापसी‌ गुंफा ता‌. लोहा येथे झाले . सन १९९२ यावर्षी ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात‌ त्यांची शिपाई म्हणून नेमणूक झाली. त्यांनी टाटानगर, गुजरात, मुंबई, जेएनपीटीसह विविध ठिकाणी कर्तव्य बजावले पुढे त्यांची पदोन्नती सहाय्य...
error: Content is protected !!