Panganga river near Himayatnagar flooded : हिमायतनगर नजीकच्या पैनगंगा नदीला आलाय महापूर; नदीकाठची हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली – -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ उमरखेड - आणि मराठवाडयाच्या नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी दोन दिवसापासून सतत चालू असलेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहेत. बोरीच्या पुलाला लागून पाणी वाहत असून, गंजेगाव पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे कालपासून विदर्भ - मराठवाडयांचा संपर्क तुटल्याने दळणवळन वाहतुक ठप्प झाली आहे. हिमायतनगर पळसपुर मार्ग ढाणकी मधील पैनगंगा नदीवर असलेल्या गांजेगाव पुलावर पावसाळ्यात नेहमीच पाणी येत असल्याने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नदीकाठचे नागरिक करत आहेत.
मागील अनेक वर्षांपासून खरीप हंगामात होणाऱ्या अतिवृष्टीच्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहातात. त्यातच पैनगंगा नदीत ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात येते तर कयाधू नदीचा पुरही पैनगंगेत येऊन मि...
