HomeनांदेडCEO Meghna Kavali : आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा - मुख्य...

CEO Meghna Kavali : आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा – मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली

नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी नांदेड जिल्ह्यातील ग्रामस्थांना दर आठवड्याला एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन केले आहे.

सध्या जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. या ठिकाणी डासांची पैदास होऊन मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दर बुधवारी ‘कोरडा दिवस’ काटेकोरपणे पाळावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले आहेत.

दर बुधवारी प्रत्येक कुटुंबाने पाण्याच्या टाक्या, भांडी, डबे तसेच नारळाच्या कवट्या, सायकल-मोटरसायकलचे टायर ईत्‍यादीमध्ये साचलेले पाणी पूर्णपणे काढून टाकावे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती मोहीम राबवावी. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनी गृहभेटीव्‍दारे ग्रामस्थांना या उपक्रमाची माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. गाव पातळीवर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवणे, साचलेली डबकी बुजवणे, नाल्यांची साफसफाई करणे अशा उपक्रमांना देखील गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments