Sunday, June 28

Tag: Observe one ‘dry day’ a week

CEO Meghna Kavali : आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा – मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली

CEO Meghna Kavali : आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळा – मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी नांदेड जिल्ह्यातील ग्रामस्थांना दर आठवड्याला एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन केले आहे. सध्या जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. या ठिकाणी डासांची पैदास होऊन मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रसार होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दर बुधवारी ‘कोरडा दिवस’ काटेकोरपणे पाळावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिले आहेत. दर बुधवारी प्रत्येक कुटुंबाने पाण्याच्या टाक्या, भांडी, डबे तसेच नारळाच्या कवट्या, सायकल-मोटरसायकलचे टायर ईत्‍यादीमध्ये साचलेले पाणी पूर्णपणे काढून टाकावे. तसेच ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती मोहीम राबवावी. आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांनी गृहभेटीव्‍दारे ग्रामस्थांन...
error: Content is protected !!