Diwali pahat ; दिवाळी पाडवा पहाट रंगतदार ठरला, पं.र्हदयनाथ मंगेशकर यांच्या विविध रचना सादर करुन उदयोन्मुख कलावंतांनी बहार आणली -NNL
नांदेड। प्रख्यात संगीतकार व गायक पं.र्हदयनाथ मंगेशकर यांच्या गितावर आधारीत र्हदयसंगम या कार्यक्रमाने दिवाळी पहाट या कार्यक्रमात रंगत आणली. जवळपास सहा हजार प्रेक्षकांनी त्यांच्या २२ गाण्यांचा मनमुराद आनंद लुटून या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नांदेडच्या उदयोन्मुख कलावंतांनी एकापेक्षा एक सरस गाणी गावून हि पहाट बहारदार बनवली.
दिवाळी-पाडवा पहाट हा कार्यक्रम बंदाघाटवर सकाळी पावणेसहा वाजता सुरु झाला. निर्माते विजय जोशी व संकल्पना व निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाची निर्मिती झाली. संगीतकार प्रमोद देशपांडे यांनी या कार्यक्रमाचा खर्याअर्थाने पाया रचून गाण्यांची निवड केली. स्थानिक कलावंत व वादकांनी या कार्यक्रमाला साजेसे रुप आणले आणि पं.र्हदयनाथ मंगेशकर यांच्या गाजलेल्या २२ गितांचा सुरेल मिलाप बंदाघाटवर झाला. उदयोन्मुख गायिका समिक्षा चंद्रमोरे, कौशिकी चेत...
