Thursday, May 14

Tag: of possibility of thunderstorms

Force Winds & Stroms and rain ; हवामान खात्याचा इशारा दिनांक 7 व 8 मे हे दोन दिवस विजांचा गडगडाट, वादळी वारे व पावसाची शक्यता

Force Winds & Stroms and rain ; हवामान खात्याचा इशारा दिनांक 7 व 8 मे हे दोन दिवस विजांचा गडगडाट, वादळी वारे व पावसाची शक्यता

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 5 मे रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 7 व 8 मे 2025 हे दोन दिवस येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 7 व 8 मे हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी.  उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमा...
error: Content is protected !!