CEO Meenal Karanwal : सीईओ मीनल करनवाल यांच्या हस्ते नांदेडमध्ये मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन -nnl
नांदेड| नांदेड शहरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने भव्य मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मीनल करनवाला यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्या संकल्पनेतून या मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, नरेगाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नियोजनचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे आदींची उपस्थिती होती.
हे प्रदर्शन नांदेडच्या मल्टीपर्पज हायस्कूल, वजिराबाद येथे 6 जानेवारीपासून सुरू झाले असून, यत्या 10 जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत खुले राहणार आह...
