Dr. Shankarao Chavan । माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत शंकरराव चव्हाण यांना समाधी स्थळी अभिवादन -NNL
नांदेड। मराठवाड्याचे भाग्यविधाते ,माजी केद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त १४ जुलै रोजी नांदेड तालुक्यातील धनेगाव (वडगाव) येथील समाधी स्थळी माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, माजी आमदार सौ.अमिताभाभी चव्हाण,सुजया चव्हाण,श्रीजया चव्हाण व चव्हाण परिवार यांच्या वतीने विधीवत पुजन करून अभिवादन केले. यावेळी आमदार,लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या विविध जिल्ह्यातील व नांदेड शहर तालुक्यातुन मोठया संख्येने पदाधिकारी यांनी अभिवादन केले. १४ जुलै रोजी कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने समाधी स्थळी जयंती निमित्ताने अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर,नांदेड ऊतरचे आ.बालाजी कल्याणकर, भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,देगलूर बिलोली चे आ.जितेंद्र...
