Violation of government order : शासन आदेशाचे उल्लंघन,बोगस पूरग्रस्तांची यादी प्रसिद्ध
नांदेड| २०२३ -२४ मध्ये नांदेड शहरात मुसळधार पाऊस पडल्याने अतिवृष्टी निर्माण झाली होती. नुकसान ग्रसतांना सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून माकप, सीटू, जमसं च्या वतीने मागील दीड वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा व तहसील नांदेड समोर विविध आंदोलने सुरु आहेत.
२०२३ मध्ये ९ कोटी व २०२४ मध्ये १८ कोटी रुपये नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर झाले आहेत. शासन निर्णया प्रमाणे मनपा व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळ पंचनामा करून जीपीस कॅमेरा द्वारे फोटोसह पूरग्रस्तांची यादी करावी असा आदेश आहे.
परंतु शासनाच्या आदेशाचे पूर्णतः उल्लंघन करून उपरोक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी जवळच्या नातेवाईक तसेच दलाला मार्फत नावे मागवून पूरग्रस्तांची यादी करून १८ कोटी रुपये हडप करण्याचा कट रचला आहे. दि. २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा संकेत स्थळावर पूरग्रस्तांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्या यादीवर अनेक पक्ष संघटणांन...
