Addiction free village campaign : व्यसनमुक्त गाव मोहिमेस शिऊर येथून प्रारंभ; लोकसहभागातून व्यसनमुक्तीचा शहाजी उमाप यांचा निर्धार -NNL
नांदेड। परिक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ दिनांक 2 ऑक्टोबर रोजी नांदेड मधील हदगाव तालुक्यातील मौजे शिऊर येथून करण्यात आला.
सदर प्रसंगी, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व मुलांची लक्षणीय उपस्थिती होती. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, नांदेड परिक्षेत्रात असणाऱ्या चारही जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतीं मध्ये ग्रामसभा घेण्यात येऊन, तंटामुक्त गांव समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गावोगावी ग्रामरक्षक दल व दुर्गा व्यसनमुक्त गाव समित्या देखील तयार करण्यात येत आहेत.
अवैध मार्गाने गाव पातळीवर पोहोचणाऱ्या व्यसनांच्या साधनांचा पोलीस बंदोबस्त करत असतानाच, व्यसनांची अशी साधने गाव पातळीवर पोहोचू नयेत या दृष्टिकोनातून, प्रत्येक गाव...
