Aghori crime news : नांदेडमध्ये अघोरी प्रकार…चोरीच्या संशयावरून दोघांना खाऊ घातला मंतरलेला नागेलीच्या पानाचा विडा…! व्हिडिओ व्हायरल
नांदेड| जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात जादूटोनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेल्या नागेलीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आला आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जादुटोना प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाप लेकासह जादूटोना करणाऱ्या भोंदूबाबाचा देखील समावेश आहे. या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, बिलोली तालुक्यातील केरूर गावात रामा नारायण आरोटे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. मागच्या महिन्यातील १९ जुलै रोजी त्यांच्या निवासस्थानी चोरी झाली होती. गावातील परमेश्वर राठोड यांच्यावर संशय होता. चोराचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी त्याला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रामा आरोटे यांनी पोलीस ठ...
