Precautions : आगीसारख्या आपत्ती प्रसंगी नागरिकांनी घ्यावयाची काळजी
नांदेड| नांदेड जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात मागील काही महिन्यात आग लागून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी तसेच काही ठिकाणी जीवित हानी होण्याच्या घटना घडलेल्या असून यापुढे कोणताही आपत्तीजनक प्रसंग उद्भवू नये याकरीता नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.
तयारी - स्टॉप ड्रॉप अॅण्ड रोल म्हणजे थांबा, खाली पडा आणि लोळा या आगीपासून बचावाच्या सरावाचा नियमित अभ्यास करा. इमारतीत धुराच्या धोक्याच्या सूचना यंत्रणा बसवल्यात का आणि त्या कार्यरत आहेत ना, याची खात्री करा. बहिर्गमन मार्ग, जिने अडथळेमुक्त ठेवा, असे पलायनमार्ग अडथळेमुक्त आहेत ना, हे नियमित तपासा. स्वयंपाक झाल्यावर सिलेंडर व्हाल्व आणि बटण बंद करा. स्वयंपाक करताना सैल, हवेत उडू शकणारे किंवा सिंथेटिक कपडे घालू नका.
शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगी टाळण्यासाठी विजेची उपकरणं, बटण, फ्यूज प्रमाणित वापरा. शॉर्ट सर्क...
