Shinde : समाजातील वंचित, शोषित, उपेक्षित, गरिबांना न्याय देण्यासाठी पदाचा उपयोग करीन, विधान परिषद सभापती शिंदे यांची ग्वाही
नवीन नांदेड l जगात भारतातील लोकशाही मोठी, सभापती पद हे संवैधानिक असून ते मोठे आहे, पदात गरीमा आहे या पदाचा समाजातील उपेक्षित, वंचित, शोषित, गरीब यांना न्याय देण्यासाठी तसेच समाजाला, पदाला, पक्षाला न्याय देण्याचे काम करण्यासाठी उपयोग करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले.
नांदेड शहरातील कौठा भागातील मातोश्री मंगल कार्यालयात त्यांचा धनगर समाजाच्या वतीने 13 एप्रिल रोजी विधान परिषदेचे सभापती झाल्याच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्कार मुर्ती म्हणून ते बोलत होते. सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे होते. यावेळी बोलताना सभापती शिंदे म्हणाले की, मी गुरुद्वारा येथे दर्शनासाठी गेलो व पहिली पायरी चढत असताना भर उन्हाळ्यात पावसास सुरवात झाली यास काय योग म्हणावा हे समजत नाही.
परिस्थितीनुसार पद मिळत गेले. क...
