‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा – NNL
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला.
दि. २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. जनार्दन गोपिले हे होते. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या आयुष्यातील केलेला संघर्ष व भारताचे नावलौकिक वाढविण्यात दिले गेलेले योगदान याबद्दल श्री. गोपीले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आजचा तरुण हा भारताचे भविष्य आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणांनी शारीरिक सुदृढ असणे आवश्यक आहे. रोगापासून वाचवायचे असेल तर प्रत्येकाने कोणता ना कोणता खेळ खेळला...
