Friday, June 26

Tag: Nanded

Ceo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास- मिलिंद व्यवहारे, नांदेड -NNL

Ceo.Meenal Karanwal । प्रेरणादायी नेतृत्वाचे एक वर्ष: मीनल करनवाल यांचा यशस्वी प्रवास- मिलिंद व्यवहारे, नांदेड -NNL

लेख, नांदेड
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू होऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मिलिंद व्यवहारे यांचा लेख. नांदेड जिल्‍हा परिषद ही समग्र ग्रामीण विकासाचा केंद्रबिुंदू आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आखून दिलेल्‍या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने काम करतात आणि कामकाजाला गती मिळते. जिल्हाभर होणा-या दौऱ्यामुळे तळागाळातील प्रशासन सजग राहते. तसेच जनतेच्या समस्या कळतात. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी असे विविध उपक्रम राबवून प्रशासनाला नवा आयाम दिला आहे. मिनल करनवाल ह्या 2018 साली आयएएस झाल्‍या. त्‍यांनी देशात 35 वा रँक मिळविला. देहरादून उत्‍तराखंडमध्‍ये त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांनी प्राथमिक शिक्षण सेंट जोसेफ अकादमीमधून पूर्ण केले. दिल्‍ली येथील ...
Nationalist Congress Party | राष्ट्रवादी शहर सहसचिवपदी सपना जोंधळे -NNL

Nationalist Congress Party | राष्ट्रवादी शहर सहसचिवपदी सपना जोंधळे -NNL

नांदेड
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर सहसचिवपदी इतवारा भागातील सपना जोंधळे निवड करण्यात आली आहे. शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात संघटन बांधणी सुरू आहे. प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची कार्यकारिणी आखणी कार्यक्रम सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांच्या नेतृत्वात शहरामध्ये प्रभागनिहाय कार्यकत्यांच्या बैठका सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय, वार्डनिहाय व्युहरचना केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरात विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी येण्यासाठी इच्छुक आहेत. त्या अनुषंगाने पक्ष बळकटीसाठी ज...
Gujarati High School Nanded | नांदेडच्या गुजराथी हायस्कूलचे स्कॉलरशिप परिक्षेत मोठे यश -NNL

Gujarati High School Nanded | नांदेडच्या गुजराथी हायस्कूलचे स्कॉलरशिप परिक्षेत मोठे यश -NNL

नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून, गुजराती हायस्कूल नांदेडचे इयत्ता पाचवी मधुन तब्बल ५० विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी ८ विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत तर इयत्ता आठवी मधून तब्बल ४४ विद्यार्थी पात्र झाले असून त्यापैकी १६ विद्यार्थी हे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत. इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत यात चि. अथर्व रामदास इसानकर (206 गुण) ,कु. गुंजन गजेंद्र गजेंद्र गुंडाळे (202 गुण) , चि. ऋषभ संजीवन मोरे (196 गुण), चि. अद्वैत अतुल नागरगोजे (192 गुण ) ,चि. कृष्णा विलास जाधव (186 गुण) , कु. भूमी दिनेश मारकड (184 गुण) ,कु. सौम्या सचिन कारले (182 गुण) ,चि. वेदज्ञ संतोष कुलकर्णी ...
राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे डॉ.जे.जी. वाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप -NNL

राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे डॉ.जे.जी. वाडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप -NNL

नांदेड
नांदेड। वसंतनगर नांदेड येथील नामांकित अशा राजर्षी शाहू विद्यालयात मराठवाडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. जे.जी. वाडेकर यांची 12 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी कराण्यात आली. याप्रसंगी कै. डॉ. जे.जी. वाडेकर यांच्या स्नुषा व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सौ. गायत्री वाडेकर यांच्या वतीने शाळेत गरीब, गरजू व होतकरू अशा 50 विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, स्कूल बॅग, वह्या इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी, आठवी व एमएनएमएस ह्यामधील खुल्या व राखीव प्रवर्गातील सहा विद्यार्थ्यांना तीस हजार रूपयांची शिष्यवृत्तीची घोषणा केली. डॉ. वाडेकर कुटुंबियांनी गेल्या 11 वर्षांपासून या शिष्यवृत्तीमध्ये खंड पडू दिला नाही. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राचार्य डॉ. गोपाळराव कदम, चंद्रशेखर सोनवणे, डॉ. पी.डी. ...
निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी केले नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण – NNL

निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी केले नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण – NNL

नांदेड
नांदेड| लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी नांदेड येथे काम पाहिले आहे. नुकतेच त्यांनी नांदेड येथील सायन्स महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्ष लावून वृक्षारोपण केले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. शिंदे, उपप्राचार्य अरुणा शुक्ला, इ.एम खिल्लारे, वनविभागाचे बेदरकर, महाविद्यालयाचे संशाधन अधिकारी विशाल मराठे, प्रा. अश्विनी बोरीकर, प्रा. रंजन राठोड, प्रा. विनायक चव्हाण आदीची उपस्थिती होती. यावर्षीच्या मे महिन्यात उन्हामुळे खूप गरम वातावरणात होते. त्यावेळी सर्वजण वृक्षारोपण करण्याबाबत बोलत होते. परंतु आता पाऊस पडल्यानंतर सर्वजण या गोष्टीला विसरुन गेले आहेत. आता वृक्ष लावण्यासाठी व वृक्षारोपण करण्यासाठी खूप चांगले वातावरण असून आपण सर्वानी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यास प...
भावाने भावाला “किडनी ” दिली व आयुष्य “बलवत्तर “केले; नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटल येथे दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण -NNL

भावाने भावाला “किडनी ” दिली व आयुष्य “बलवत्तर “केले; नांदेडच्या श्री गंगा हॉस्पिटल येथे दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण -NNL

नांदेड
नांदेड। किडनी प्रत्यारोपण पुणे मुंबई हैदराबाद येथे जाण्याची गरज नाही .नांदेड मधील श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ शहाजी जाधव यांच्यामुळे या रोगावर उपचार येथेच मिळत आहे. एका महिण्यात सलग दुसऱ्यादा रुग्णास जीवदान देण्याचे काम या रुग्णालयाने केले आहे.. किडनी निकामी झाल्याचे समजताच हादरून गेलेल्या परंतु हिम्मत न हारता आपली एक किडनी भावाला देऊन त्याला नवे जीवन दिले. सख्खे भाऊ एकमेकांचे पाठीराखे असा बंधू प्रेमाचा प्रेमाचे संदेश त्यांनी समाजाला कृतीतून दाखवून दिला .किडनी तज्ञ डॉ शहाजी जाधव यांनी श्री गंगा हॉस्पिटल नांदेड येथे दुसरी यशस्वी किडनी प्रत्यारोपण केले. तेलंगणा राज्यातील निर्मल येथील बलवंतराव राठोड (वय 43 ) हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते .एप्रिल महिन्यात त्यांना अंगावर सुजन येणे व दम लागत असल्यामुळे हैद्राबाद येथील आर्मी हॉस्पिटल मधील डॉक्टरांना दाखविले अस...
error: Content is protected !!