grand Bhimgeet singing program : नांदेड जिल्हा परिषदेतर्फे 19 जून रोजी भव्य भीमगीत गायनाचा कार्यक्रम
नांदेड| क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने भव्य भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, 19 जून 2025 रोजी दुपारी तीन वाजता ओम गार्डन, नागार्जुन पब्लिक स्कूलसमोर, जुना कौठा, नांदेड येथे पार पडणार असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली राहणार आहेत.
या कार्यक्रमाला खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची उपस्थिती राहणार असून, उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व न...
