Nanak-Sai ; नानक-साई ची घुमान चळवळ पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह – शामपुरा – NNL
नांदेड l "मजबूत भाईचारे की सांज" ही संकल्पना घेऊन नानक साई फाऊंडेशन मागील २१ वर्षापासून पंजाब आणि महाराष्ट्रात काम करत असून नानक-साई ची घुमान चळवळ दोन राज्यासाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादन लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांचे विश्वासू सेवादार सरदार रुपिंदरसिंघ जी शामपुरा यांनी नांदेड येथे केले.
सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून असलेल्या नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन’ च्या कार्याला २१ वर्ष व संत नामदेव महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या घुमान सद्भावना यात्रेला ११ वर्ष पूर्ण झाल्याच्या अवचीत्याने स्नेहसंमेलन नांदेड येथे हॉटेल सेंट्रल पार्कला आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरदार रुपिंदरसिंघ जी शामपुरा उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख तथा नांदेडच्या सामाजिक चळवळीत...
