Municipal Corporation ; महापालिकेतर्फे खाद्यपदार्थ प्रक्रियेतील फेरीवाल्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे पीएम-स्वनिधी योजनेच्या सुधारित कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिनांक १७.०९.२०२५ ते ०२.१०.२०२५ या कालावधीमध्ये राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान विभागामार्फत लोककल्याण मेळावा अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून दि.०१.१०.२०२५ रोजी कै.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे खाद्यान्न प्रक्रियेतील पथविक्रेत्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.
या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते झाले.यावेळी मनपा आयुक्त यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना खाद्यपदार्थ विक्री करताना स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून खाद्यान्न प्रक्रियेतील व्यवसायामध्ये मोठी संधी असल्याचे विशद करताना जास्तीत जास्त खाद्यपदार्थ व्यवस...
