International Disaster Day ; आंतरराष्ट्रीय आपत्ती दिनानिमित्त महापालिकेत मॉकड्रिल
नवीन नांदेड l जागतिक आपत्ती व धोके निवारण दिनाचे औचित्य साधुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मुख्य कार्यालयातील प्रांगणात दि.१३.१०.२०२५ रोजी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. कोणतीही आपत्ती सांगुन येत नाही मात्र आपत्ती ओढवलीच तर तातडीने करावयाच्या उपाययोजना तसेच आपत्ती येऊच नये यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या मॉकड्रिलला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. याप्रसंगी दुर्घटना घडल्यास व्यक्तींचा बचाव व आग लागल्यास विझविण्यासंबंधी प्रात्यक्षिके करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त महापालिकेत आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित केले जाते. या मॉक ड्रिलमध्ये आग लागणे किंवा भूकंप यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यायचे, हे तपासले जाते. नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्ष...
