धार्मिकनांदेडव्हिडीओ

Dnyaneshwari Parayana : शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची भक्तिमय सांगता

हिमायतनगर, अनिल मादसवार| महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात (Shri Parameshwar Mandir) येथे मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची दि. २० फेब्रुवारी रोजी ग्रामदिंडी व हभप नारायण महाराज गरड ( Narayan Maharaj Garad) यांच्या मधुर काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय सांगता करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागातून हजारो भक्तांचा जनसागर मंदिर परिसरात लोटला होता.

पालखी दिंडीने शहर दुमदुमले
सकाळी ९ वाजता व्यासपीठाचार्य हभप शिवाजी महाराज वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी दिंडी शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली. चिमुकल्या मुलींनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व हाती भगवा ध्वज घेत सहभाग नोंदविला. टाळ-मृदंगाच्या गजरात श्री परमेश्वर भजनी मंडळाच्या वारकरी महिला-पुरुषांनी ताल धरत शहरवासीयांचे लक्ष वेधले.

oplus_0

दिंडी परत मंदिरात आल्यानंतर सत्कार समारंभ व महाप्रसादाने पारायणाची सांगता करण्यात आली. शिवभक्त बंटी गुड्डेटवार यांनी ११ किलो खवा प्रसादाचे वितरण केले.

काल्याच्या कीर्तनात श्रीकृष्ण लीलेचे रसाळ विवेचन
दुपारी १.३० वाजता सुरू झालेल्या काल्याच्या कीर्तनात जवळपास तीन तास नारायण महाराज गरड यांनी श्रीकृष्ण लीलेचे सखोल मार्गदर्शन करत उपस्थितांना भक्तीचा मार्ग दाखविला. दरम्यान आमदार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर (Madhavrao Patil Javalgaonkar) तसेच तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर (Pallavi Temkar) यांनी भेट देत श्री परमेश्वराचे दर्शन घेत कीर्तनाचा लाभ घेतला.

oplus_0

सायंकाळी ५ वाजता राधा-कृष्णाची झांकी साकारलेल्या बालकांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर काल्याच्या प्रसाद वितरणासह राधाकृष्णांची मिरवणूक शहरातून काढण्यात आली. या कार्यक्रमास मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला-पुरुष, युवक आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित या सोहळ्याने हिमायतनगर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button