Saturday, May 30

Tag: Meeting held

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्माण करण्यासंदर्भात मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक १२ मार्च २०२६ रोजी दुपारी ३ वाजता मंत्रालय, मुंबई येथील विस्तार इमारतीतील समिती कक्ष क्रमांक ३१९ मध्ये आयोजित करण्यात आली होती. ही बैठक राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत हदगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद लवकरात लवकर निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच हदगाव वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. ...
error: Content is protected !!