Dr. Rekhatai Pa. Chavan Gorlegaokar : गणेशोत्सव – २०२४ निमित्त “सुंदर माझा बाप्पा स्पर्धा” जास्तीत जास्त मंडळ व गणेश भक्तांनी सहभाग घ्यावा – डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर -NNL
नांदेड, अनिल मादसवार| हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळ व गणेश भक्तांना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सव - २०२४ निमित्त "सुंदर माझा बाप्पा स्पर्धा" आयोजित करून गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केली आहे.
यंदाचा गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. जगातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे गणेश उत्सव असून, या उत्सवाचे औचित्य साधून सार्वजनिक गणेश मंडळ व गणेश भक्तांच्या वतीने विविध देखावे, सजावट आणि विविध उपक्रम राबवल्या जातात. गणेश भक्तांच्या उपक्रमांना चालना मिळावी आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांनी हदगाव हिमायत...
