Madhav Devsarkar : नांदेडमध्ये मराठा समाजाची वज्रमूठ राज्यस्तरीय बैठक रविवारी
नांदेड| मराठा समाजाची पुरोगामी चळवळ मोडून काढून सरकार मराठा समाजाची कोंडी करण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे सरकारचे मनसुबे उधळून लावून मराठा समाजाबद्दल षडयंत्र रचणार्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी समाजाची पुन्हा एकदा ताकद दाखवून देण्यासाठी नांदेडमध्ये रविवार, दि. 27 जुलै रोजी वज्रमूठ राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत समविचारी मराठा समाजाच्या सर्व संघटनांचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर (Madhav Devsarkar) यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देणार्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला त्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे लढाऊ नेते विजय भैया घाडगे यांच्यावर लातूरमध्ये सत्ताधार्यांकडून झालेला भ्याड हल्ला, या ...
