Friday, June 26

Tag: Mangoes get

second harvest : वादळी वाऱ्यानंतर आंब्याला दुसऱ्यांदा मोहर; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना आशेची नवी पालवी

second harvest : वादळी वाऱ्यानंतर आंब्याला दुसऱ्यांदा मोहर; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना आशेची नवी पालवी

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व वातावरण बदलल्याने आंब्याच्या झाडांवरील पहिला मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला होता. त्यामुळे यंदा आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि चैत्र महिन्याच्या शुभ मुहूर्तावर आंब्याच्या झाडांना पुन्हा एकदा मोहर फुटू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धुवारी आणि वादळामुळे झाडांवरील मोहर गळाल्यानंतर बागायतदार चिंतेत होते. परंतु सध्या अनेक भागात आंब्याच्या झाडांना दुसऱ्यांदा मोहर येताना दिसत आहे. काही झाडांवर आधीच कैऱ्या लागल्या असताना त्याच झाडांना पुन्हा नव्याने मोहर फुटल्याचे चित्र दिसत आहे. या अनोख्या परिस्थितीमुळे यंदाच्या उन्हाळ्यात आंब्याचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता बागायतदार व्यक्त करत आहेत. हवामान अनुकूल राहिल्यास दुसऱ्या मोहरातूनही चांगल्या प्रमाण...
error: Content is protected !!