पिंटू पाटील वायफनिकर यांच्या पुढाकारातून माहूर-सिंदखेड बससेवा सुरू विद्यार्थ्यांसह दैनंदिन प्रवाशांनी मानले आभार
श्रीक्षेत्र माहूर l नांदेड जिल्ह्यातील माहूर आगारामार्फत आमदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंटू पाटील यांच्या अथक प्रयत्नातून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माहूर ते सिंदखेड बस सेवा सुरू करण्यात आली असून माहूर सिंदखेड या मार्गावरील शालेय विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांना नागरीकांना सोयीचा प्रवास मिळणार असल्याने युवानेते पिंटू उर्फ लक्ष्मीकांत पाटील वायफनिकर यांचे शालेय विद्यार्थ्यांसह सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे.
सिंदखेड ते माहूर या मार्गावर अनेक लहान मोठ्या गावांचा समावेश आहे.परिसरातील नागरिकांना शासकीय,दैनंदिन कामासाठी,तसेच माहूर या तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये - जा करावी लागते.मात्र बससेवेअभावी शालेय विद्यार्थ्यांना,ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.परणामी परिसरात काही शालेय विद्यार्थ...
