Shravanmas ; श्रावणमास निमित्ताने नरोबा देवस्थान कौठा येथे माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते महाअभिषेक
नवीन नांदेड l लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नरोबा देवस्थान कौठा येथे श्रावण महिन्याचा शेवटच्चा शनिवार निमित्ताने माजी आमदार अमरभाऊ राजुरकर भाजपा नांदेड महानगर
अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. श्रावण मास निमित्ताने महिनाभर दैनंदिन महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे. नरोबा देवस्थान मंदिर कौठा नांदेड येथे श्रावणमास महिन्यांत शेवटच्या शनिवार निमित्ताने 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता महाअभिषेक व महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गुरू व्यंकटेश मुळी यांच्या विधीवत आचार्य तत्वाने मंत्रोच्चार करण्यात आले, यावेळी शैकडो भाविक भक्तांचा उपस्थित महाअभिषेक संपन्न झाला.यावेळी विश्वस्त समिती अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, कार्याध्यक्ष विनोद काकडे,नगरसेवक राजू पाटील काळे,राजु गोरे,संजय मोरे,अभिषेक सौदे,शितल खांडील,अप...
