Sunday, June 28

Tag: losses worth lakhs

Thieves raid : एकाच रात्री २५ शेतकऱ्यांच्या मोटारींचे केबल चोरीला ; कारला शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ, लाखोंचे नुकसान

Thieves raid : एकाच रात्री २५ शेतकऱ्यांच्या मोटारींचे केबल चोरीला ; कारला शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ, लाखोंचे नुकसान

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील कारला शिवारात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या शेतातील बोअर व सिंचन विहिरींमध्ये असलेल्या मोटारींचे केबल कापून पसार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.   एकाच रात्री जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतातील ५० ते ७० फूट लांबीचे केबल चोरीला गेल्याचे समोर आले असून, मोटार स्टार्टर्स फोडून तांब्याचे केबल कापून नेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना पाणी देण्याची अत्यंत महत्त्वाची वेळ असताना मोटारी बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. लाखो रुपये किमतीचा केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.   गेल्या महिनाभरापासून ब...
error: Content is protected !!