District Collector Rahul Kardile : 13 मार्च शेवटची संधी! नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’साठी त्वरित नोंदणी करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड| केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केवळ ३२ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. १३ मार्च हा या विशेष नोंदणी सप्ताहाचा अंतिम दिवस असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्ह्यातील २ लक्ष ४५ हजार २७६ शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली असली, तरी अपेक्षित संख्येपेक्षा हा आकडा कमी आहे. त्यामुळे १२ आणि १३ मार्च या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर नोंदणी होण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे.
सध्याच्या नोंदणीमध्ये हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक, कंधार तालुका पिछाडीवर
नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तर कंधार तालुक्यात अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया लवकरा...
