नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांना निट,जेईई मोफत प्रशिक्षणासाठी प्रयत्न करु -आ.जवळगांवकर यांची ग्वाही -NNL
नांदेड, अनिल मादसवार। जिल्ह्यातील सर्वच समाजघटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना नीट व जेईई या प्रवेश परिक्षांचे पूर्व प्रशिक्षण शासनाकडून निःशुल्क तसेच, विद्यावेतनातून व निवासी स्वरुपात व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील असून राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची याबाबत लवकरच भेट घेऊन पाठपुरावा करु अशी ग्वाही हदगांव-हिमायतनगरचे लोकप्रिय आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या बार्टी, सारथी,महाज्योती व आदिवासी तसेच,अल्पसंख्याक विकास विभागाकडून जात प्रवर्गनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांना निट व जेईई परिक्षांचे पूर्व प्रशिक्षण निवासी स्वरुपात व विद्यावेतनातून निःशुल्क पद्धतीने नांदेड जिल्ह्यातच मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आ.माधवराव पाटील जवळगांवकर यांची भेट घेऊन राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी व नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा...
