Dr. Babasaheb Ambedkar ; भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जय भीम पदयात्रेचे रविवारी आयोजन
नांदेड | आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती 14 एप्रिल2025 रोजी आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासन, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र यांच्या समन्वयाने जय भीम पदयात्रेचे आयोजन रविवार 13 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 7.30 वा. करण्यात आले आहे.
या पदयात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे आहे. श्री गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम, जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृह येथून सुरुवात होऊन आयटीएम कॉलेज-ग्लोबल हॉस्पीटल समोरुन-महात्मा जोतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन- परत कुसुम सभागृह मार्ग- जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा वसतिगृह येथे या पदयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.
या पदयात्रेमध्ये नांदेड जिल्हयातील शैक्षणीक संस्थेमधील शालेय विद्...
