Mudkhed Panchayat Samiti ISO Rating : मुदखेड पंचायत समिती आयएसओ मानांकन -NNL
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुदखेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन मिळवणाऱ्या जिल्ह्यातील मुदखेड पंचायत समिती तिसरी आहे. यापूर्वी नांदेड व लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाले आहे.
मुदखेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी श्रीकांत बळदे, गटशिक्षणाधिकारी आर. एल.आडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, आयएसओ मानांकन परीक्षक योगेश जोशी, अनिल येवले, विस्तार अधिकारी एस. यु. भाडेकर, निलेश बंगाळे, दत्तात्रय उपलेंचवार, हंबर्डे, सुरेश पाटील, कृषी विभाग बंदेल, पाटील, गोडसे, अधीक्षक संतोष दासरवाड, व्ही. के. सोनुने, गट समन्वयक लक्ष्मीकांत टाकळकर, मोहित गायकवाड तसेच प...
