9.7 crore voters in the state : राज्यात ९.७ कोटी मतदार; पुण्यात सर्वाधिक; पाच जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक -NNL
मुंबई| विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत अधिक आहे.
पुण्यात ८८ लाखांहून अधिक मतदार
पुण्यातील एकूण मतदारसंख्या ८८ लाख ४९ हजार ५९० आहे तर मुंबई उपनगरात ७६ लाख ८६ हजार ९८ मतदार आहेत. ठाण्यात ७२ लाख २९ हजार ३३९, नाशिक जिल्ह्यात ५० लाख ६१ हजार १८५ आणि नागपुरात ४५ लाख २५ हजार ९९७ मतदार आहेत.
पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या अधिक
रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. रत्नागिरीतील एकूण मतदार संख्या १३ लाख ३९ हजार ६९७ असून यामध्ये ११ तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदार ६ लाख ४६ हजार १७...
