नांदेडकरियर

Maharashtra State Retired Teachers Association : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटना माहूर तालुकाध्यक्ष पदी गोस्वामी

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटनेच्या ( Maharashtra State Retired Teachers Association) माहूर तालुकाध्यक्ष पदी डी . आर . गोस्वामी यांची निवड करण्यात आली.

नोंदणीकृत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी संघटना माहूर तालुका शाखा निवडीची बैठक दि . २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष सुधिर गोडघासे  जिल्हा कार्याध्यक्ष एम .बी . शेख , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बी . एस . सरोदे जिल्हा सल्लागार प्रभाकर कमटलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माहूर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यकारिणीत तालुका अध्यक्ष पदी डी. आर. गोस्वामी, सरचिटणीस एस . बी . कदम सहसचिव पी. जी . शिन्दे कार्याध्यक्ष बी टी .येरावार कोषाध्यक्ष बी. एम . स्वामी उपाध्यक्ष खान एम .ए . तर सल्लागार डी . डी . कदम ,मधुकर डुरके यांची निवड झाल्याचे जिल्हाध्यक्षा विजया घिसेवाड यांनी घोषणा केली . या बैठकीचे सुञ संचालन एस . एस . पाटील यांनी केले तर आभार समाधान कदम यांनी मानले .

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button