नांदेड

short circuit ; जुनागंज येथील असलम मेडिकलला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग – लाखो रुपयांचे औषधसामान जळून खाक

नांदेड l शहरातील जुनागंज परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास असलम मेडिकल या औषध दुकानाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे औषधसामान जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग शेजारील दुकानांमध्ये पसरली नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दुकानाचे मालक मोहम्मद असलम यांनी सांगितले की, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button