Film Acting Course : ‘स्वारातीम’ विद्यापीठात चित्रपट अभिनय अभ्यासक्रमाची सुरुवात -NNL
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुल आणि फिल्म अँड टेलिव्हीजन इंन्स्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ जानेवारी ते २८ मार्च या कालावधी दरम्यान तीन महिन्यांच्या फाउंडेशन कोर्स इन स्क्रिन ॲक्टिंग अभ्यासक्रमाचे दुस-यांदा आयोजन करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमाची दि. ६ जानेवारी पासून करण्यात आली आहे. अभ्यासक्रमाच्या पहिल्या दिवशी ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॅा. पृथ्वीराज तौर व भाषा संकुलाचे संचालक डॅा. दिलीप चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अभ्यासक्रमाचे सहाय्यक संचालक तथा एफटीआयआय चे तज्ञ सुशांत शर्मा व फाउंडेशन कोर्स इन स्क्रिन ॲक्टिंग अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील अभ्यासक्रमात महाराष्ट्रासह राजस्था...
